वाक्प्रचार मराठी


------------------------------------------
       वाक्प्रचार -


(1) अग्निदिव्य करणे-कठीण कसोटीला उतरणे.

(2) अटकेपार झेंडा लावणे-फार मोठा पराक्रम गाजवणे,

(3) अठरा विश्वे दारिद्रय असणे-पराकोटीचे दारिद्रय असणे,

(4) अडकित्त्यात सापडणे-पेचात सापडणे.

(5) अत्तराचे दिये लावणे-भरपूर उधळपट्टी करणे

(6) अन्नास जागणे-उपकार स्मरणे,

(7) अन्नास मोताद होणे-आत्यंतिक दारिद्र्यात जगणे, उपासमार होणे,

18) अन्नास लावणे- उपजीविकेचे साधन मिळवून देणे.

(9) अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे-थोड्याशा यशाने चढून जाणे.

(10) आकांडतांडव करणे-रागाने आदळआपट करणे,

(11) आकाश ठेंगणे होणे-अतिशय आनंद होणे,

(12) आकाशपाताळ एक करणे-फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.

(13) आकाश फाटणे-चारी बाजूंनी संकटे येणे.

(14) आकाशाला गवसणी घालणे- आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.

(15) आगीत तेल ओतणे-भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे,

(16) आच लागणे-झळ लागणे,

(17) आपल्या पोळीवर तूप ओढणे-दुसऱ्याचा मुळीच विचार न करता, साधेल तेवढा स्वत:चाच फायदा करून घेणे.

(18) आभाळ कोसळणे-एकाएकी फार मोठे संकट येणे,

(19) इकडचा डोंगर तिकडे करणे-फार मोठे अवघड कार्य पार पाडणे,

(20) उखळ पांढरे होणे-पुष्कळ फायदा होणे,

(21) उखाळधापाखाळया काढणे- एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे,

(22) उचलबांगडी करणे-एखादयाला जबरदस्तीने हलवणे.

(23) उंटावरून शेळ्या हाकणे-प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे,

(24) उदक सोडणे - एखादया वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे,

(25) उद्ध्वस्त होणे- नाश पावणे,

(26) उन्मळून पडणे-मुळासकट कोसळणे,

(27) उन्हाची लाही फुटणे-अतिशय कडक ऊन पडणे,

(28) उराशी बाळगणे-मनात जतन करून ठेवणे,

(29) उलटी अंबारी हाती येणे-भीक मागण्याची पाळी येणे,

(30) उष्ट्या हाताने कावळा न हाकणे-कधी कोणाला यत्किचितही मदत न करणे.

(31) ऊत येणे- अतिरेक होणे.

(32) एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे,

(33) अंगाची लाही लाही होणे - क्रोधाने क्षुब्ध होणे,

(34) अंगावर काटा उभा राहणे- भीतीने अंगावर शहारे येणे,

(35) अंगावर मूठभर मांस चढणे-धन्यता वाटणे.

(36) अंगाचा तिळपापड होणे-अतिशय संताप येणे.

(37) अंथरूण पाहून पाय पसरणे- ऐपतीनुसार खर्च करणे,

(38) कणीक तिंबणे-खूप मार देणे.

(39) कपाळ फुटणे-दुर्दैव ओढवणे.

(40)  कपाळमोक्ष होणे-मरण पावणे,

(41) कान फुकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,

(42) कानावर पडणे - सहजगत्या माहीत होणे,

(43) कानावर हात ठेवणे - माहीत नसल्याचा बहाणा करणे,

(44) कानउघाडणी करणे-कडक शब्दांत चूक दाखवून देणे,

145) काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे,

(46) कानाडोळा करणे-दुर्लक्ष करणे.

(47) कान टवकारून ऐकणे - अगदी लक्षपूर्वक ऐकणे,

(48) कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे,

(49) काट्याने काटा काढणे - एका शत्रूच्या साहाय्याने दुसऱ्या शत्रूचा पराभव करणे.

(50) काट्याचा नायटा होणे-क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.

(51) कावराबावरा होणे-बावरणे.

(52) काळजाचे पाणी पाणी होणे-अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.

(53) कुत्रा हाल न खाणे-अतिशय वाईट स्थिती येणे.

(54) कंठस्नान घालणे-ठार मारणे,

{55) कंठशोष करणे-ओरडून गळा सुकवणे, उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.

(56) कंबर कसणे- एखाद्या गोष्टीसाठी हिंमत करून तयार होणे,

157) कुंपणाने शेत खाणे-ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.

(58) केसाने गळा कापणे-वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखादयाचा घात करणे.

(59) कॉबडे झुंजवणे -दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.

(60) कोपरापासून हात जोडणे - काहीही संबंध न राखण्याची इच्छा प्रकट करणे.

(61) खडा टाकून पाहणे-अंदाज घेणे.

(62) खडे चारण-शरण येण्यास भाग पाडणे.

(63) खापर फोडणे - एखाक्यावर निष्कारण ठपका ठेवणे.

(64) खाजवून खरूज काढणे- मुद्दाम भांडण उकरून काढणे,

65) खाल्ल्या घरचे वासे मोजणे-उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतणे

66) खूणगाठ बांधणे-पक्के ध्यानात ठेवणे,

67) खो घालणे-विघ्न निर्माण करणे.

(68) गर्भगळित होणे- अतिशय घाबरणे,

(69) गळ घालणे-अतिशय आग्रह करणे.

70) गळ्यात पडणे-एखादयाला खूपच भीड घालणे,

71) गळ्याशी येणे-नुकसानीबाबत अतिरेक होणे.

72) गाडी पुन्हा रुळावर येणे- चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे,

73) गुजराण करणे-निर्वाह करणे,

74) गुण दाखवणे-(नकली स्वभाव टाकून) खरे स्वरूप प्रकट करणे,

(75) गंगत घोडे न्हाण-कार्य तडीस गेल्यावर खूप समाधान वाटणे,

76) गळ्यात धोंड पडणे-इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे,

(77) गाशा गुंडाळणे- एकाएकी निघून जाण; एकदम पसार होणे,

78) गौडबंगाल असणे-गूढ गोष्ट असणे; काहीतरी रहस्य असणे.
------------------------------------------
    

No comments:

Post a Comment